Friday 30 December 2011

म्हणे अश्या सचिनला ' भारत रत्न ' द्या !

बातमी ताजी आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सचिन तेंडूलकर याने आपल्या मुंबईतील नव्या बंगल्यात गृह प्रवेश करण्यापूर्वी आकयुपेशन सर्टिफिकेट न घेतल्या मुले त्याला ४ लाख ३५ हजाराचा दंड भरावा लागला. त्या बद्दल अनेकांनी मुंबई महानगर पालिकेला विनंत्या केल्या की एवढ्या महान खेळाडूला दंड करू नका म्हणून. मात्र म.न.पा. च्या निर्दयी अधिकाऱ्यांनी बिचार्या सचिनला दंडाची रक्कम भरायलाच लावली.( किती मोठा गुन्हा केला त्यांनी ) काही वर्षांपूर्वी याच सचिनला भेट म्हणून मिलेल्या फेरारी कार वरील आयात शुल्क ( जे की काही लाखाच्या घरात होते ) ते सुद्धा असेच माफ झाले होते ( तेव्हा पण या ' गरीब ' खेळाडूने स्वत आणि त्याच्या चाहत्यांनी सरकारवर असाच दबाव आणला होता ). मुंबई मधील आपल्या बंगल्याला वाढीव एफ .एस .आय. मिळावा म्हणून देखील त्याला कितीतरी आर्जव सरकारकडे करावी लागली. या कमी अनेक राजकीय धेंडानी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे आमच्या कानी आले आहे.

तर सांगायचे एवढेच की क्रिकेट , जाहिरातबाजी , हॉटेल आणि अन्य ज्ञात -अज्ञात मार्गांनी वर्षाकाठी अब्जावधी रुपये खोर्याने ओढणाऱ्या या खेळाडूची वृत्ती मात्र अगदीच शुद्र असल्याचे सत्य अनेकदा बाहेर आले आहे. आपण म्हणजे लोकांच्या गळ्यातले ताईत असल्यामुळे आपल्यासाठी देशातील सारे कर ,सारे दंड,सर्व कायदे आणि नियम शिथिल केले जावेत असा गोड गैरसमज या इसमाने करून घेतला आहे ( असे कित्येक महाभाग क्रिकेट आणि चित्रपट सृष्टी मध्ये आहेत ). 

आज देशातील सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी शेतकरी,कामगार ,शेत मजूर असे बहुसंख्य लोक आपल्यावरील कोणताही कर असो वा दंड असो निमुटपणे भारतात. वेळप्रसंगी पैश्याची तरतूद करण्यासाठी उधार-उसनवारी करतात, अगदी व्याजाने पैसे आणून सरकारच्या मढ्यावर घालतात. मात्र या उलट सचिन तेंडूलकर सारखे अब्जाधीश लोक ऐपत असतांनाही जमेल त्या मार्गाने सरकारी कर, दंड भरण्याचे टाळतात. दुर्दैव हे की त्यांच्यासाठी आमचे राजकारणी सवलतीची आणि माफीची शिफारस निर्लज्यपणे करतात मात्र,कधीच शेतकरी,शेतमजूर,कामगार आणि सामान्य माणसाकरिता असे अहमहीकेने भांडत नाहीत. एकूणच काय की चोर सोडून संन्याश्याला सुळावर देण्याचा खेळ राजरोसपणे सुरु आहे. व्वा रे सरकार...आणि व्वा रे सेलिब्रेटी..... म्हणे अश्या तेंडुलकरला ' भारत रत्न ' द्या ! कशाला ? या देशातील कर्तुत्ववान आणि प्रामाणिक लोक संपले आहेत काय ?

No comments:

Post a Comment