Tuesday, 27 December 2011

आमचा वर्षारंभ १ जानेवारी नव्हे ,चैत्र प्रतिपदा !


प्रिय बंधू-भगिनींनो ,
पाश्चात्य विकृतीचे अंधानुकरण करता,करता आम्ही आमचे स्वत्व विसरलो आहोत. आमचे आचार , विचार , संस्कार या सर्व बाबी इतिहास जमा होत चालल्या आहेत. दर वर्षी ३१ डिसेम्बरच्या रात्री मद्य धुंद तरुण-तरुणीचा धांगडधिंगा शरमेने मान खाली घालायला लावणारा असतो. मुळात आपले नवे वर्ष चैत्र प्रतिपदेला सुरु होते. त्या दिवशी पहाटे हा उत्सवसाजरा व्हावा. पण काही अज्ञानी जनता १ जानेवारीलाच नवे वर्ष सुरु होते असे समजून शिर्डीच्या साईबाबांना, शेगावच्या गजानन महाराजांना आणि आपल्या आराध्य देव-देवतांना जाऊन दर्शन घेते.अश्या लोकांना आपण नेमके काय करीत आहोत याचे जराही भान नसते.
     या दोन्ही उदाहरणांत भिन्नता असली तरी शेवटी हेतू मात्र एकच आहे आणि तो म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करणे. पद्धतीत बदल असला तरी मुळ भूमिका मात्र बदलत नाही. १ जानेवारीला वेगवेगळी थेरं करणारे हे वर्ष प्रतिपदेला मात्र  पार्श्वभागावर उन पडे पर्यंत पांघरुणातच पहुडलेले असतात. त्यांना हे भान मुळीच नसते की आज आपल्या नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे. खरे तर चैत्र प्रतिपदेला नवे वर्ष सुरु होण्यास मोठी प्राचीन परंपरा आहे. मात्र, आपला उज्वल इतिहास विसरलेल्या लोकांना याची तीळमात्र जाणीव नसते.या उलट ३१ डिसेंबरच्या रात्री आचरट चाळे करण्या पासून तर अगदी सभ्य पाने परस्परांना  " ह्याप्पी न्यू ईअर " च्या शुभेछा देण्यात ते धन्यता मानतात.  खरोखर आमच्या समाजाची ही अंधानुकारणाची पद्धत जगावेगळी आहे.हे चित्र बदलणे अत्यावश्यक आहे. नव्हे ही काळाची गरज आहे. कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही हे वैश्विक सत्य आहे. 
     असो, आज मात्र आपण एक निर्धार करूया ! येत्या ३१ डिसेंबर च्या रात्री आपल्यापैकी कोणीच राष्ट्रभक्त नव्या वर्षाच्या स्वागताच्या नवा खाली विदेशी विकृतीच्या समोर मानझुकविणार नाही आणि इतरांनाही झुकवू देणार नाही.समर्थ भारत केंद्राच्या या आवाहनास प्रतिसाद द्या आणि नवे वर्ष १ जानेवारीला नव्हे तर गुढी पाडव्याला साजरे करा.   .....................................................वंदे मातरम !!!

No comments:

Post a Comment