Wednesday, 14 August 2013
स्वतंत्र विदर्भ राज्य एक शापित वास्तव ( लेखमाला )
माझ्या बंधू- भगिनींनो सप्रेम जय विदर्भ …
केंद्र सरकारने तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्याची घोषणा अलीकडेच केली (ही घोषणा वास्तवात कधी येईल हे सांगणे अशक्य आहे. कारण कॉंग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन तेलगु जनतेला हे दिलेले गाजर ठरण्याची अधिक शक्यता आहे) तेव्हा पासून स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विदर्भाच्या वेगळ्या राज्याला भावनिक विरोधच जास्त होतोय ही खेदाची बाब आहे. कारण, विदर्भ राज्याची मागणी तब्बल सव्वाशे वर्षांपासूनची असून तीला प्राचीन, ऐतिहासिक, अर्थशास्त्रीय, भौगोलिक, नैतिक, सामाजिक असे अनेक आधार आहेत. त्यांचा अभ्यास केल्यास मराठी भाषिकांचे एकच राज्य पाहिजे हे तुणतुणे वाजवणे म्हणजे केवळ दुराग्रह ठरतो. या विषयावरील सर्वंकष माहिती, सदर मागणीची पार्श्वभूमी, त्या संबंधीचे ठोस पुरावे आणि वर्तमान परिस्थिती नाकारून विदर्भाच्या मुद्द्याला विरोध करणे म्हणजे स्वतः च स्वतः चा बुद्धिभेद करून घेणे होईल . या सर्व बाबींचा सांगोपांग विचार करूनच ' स्वतंत्र विदर्भ राज्य एक शापित वास्तव ' ही लेखमाला मी आजपासून सुरु करीत आहे. फेसबुकच्या माध्यमातून हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा आणि विवेकबुद्धीने या लोकभावनेचा आदर राखून विदर्भ राज्याच्या विषया वर निकोप चर्चा व्हावी हाच या लेखमाले मागील उद्देश आहे . आपण देखील हीच भावना ठेऊन या महाचर्चेत सहभागी व्हाल हीच सार्थ अपेक्षा .......................... वन्दे मातरम !!!
आपलाच
रेणुकादास मुळे
चिखली, जिल्हा बुलडाणा (विदर्भ )
Subscribe to:
Post Comments (Atom)
जय विदर्भ …
ReplyDelete