Friday 1 June 2012

शाम मानव ... हिंदू विरोधी भोंदू सुधारक !

           अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा सरचिटणीस शाम मानव हा  तद्दन ढोंगी माणूस असल्याचा अनुभव मला १० वर्षांपूर्वीच आला होता. त्याचे झाले असे की, मी सकाळ मध्ये काम करीत असतांना एकदा आमचे जिल्हा बातमीदार गुळवे अण्णा हे काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यांनी मला कार्यालय सांभाळायला बुलढाण्याला पाठविले असता शाम मानवच्या पत्रकार परिषदेला जाण्याचा योग आला. सुरवातीला शाम मानवने आवेशपूर्ण भाषण ठोकले.त्यानंतर पत्रकारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले.पत्रकारांनी विचारलेल्या सोयीस्कर प्रश्नांना त्याने उत्साहात उत्तरे दिली मात्र,अडचणीच्या प्रश्नांना हा पुरोगामी माणूस खुबीने बगल देऊ लागला. मी आणि सामनाचे जिल्हा प्रतिनिधी राजेश देशमाने यांनी त्याला सैलानी दर्ग्यावर चालनार्या भोंदुगिरी बद्दल छेडले असता तो पुरता गांगरला.
     बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी दर्गा येथे मानसिक रुग्णांवर उपचाराच्या नावाखाली चालणारे छु...मंतर, गंडे-दोरे, मुक्या जीवांचे बळी, महिलांचे अंगात येणे आणि झुलणे अश्या गैरप्रकारांसह एकटी-दुकटी बाई पाहून कामपिपासू नराधमांकडून केले  जाणारे पाशवी बलात्कार असा कुकार्मांचा पाढा मी वाचला. हे प्रकार नक्कीच समर्थनीय नाहीत तर मग आपण या विरुद्ध का आवाज उठवत नाही असा भाबडा प्रश्न मी विचारला. पण माझ्या या आगळीकीने शाम बाबूचे पित्त खवळले.तो उसळून बोलू लागला, नेमके उत्तर टाळू लागला. मी पुन्हा थेट प्रश्न टाकला की हिंदू धर्मातील अंधश्र्द्धांबद्दल आपण पोटतिडकीने बोलता, आम्ही पण अश्या कालबाह्य रूढी आणि बुरसटलेल्या गोष्टींना विरोधच करतो परंतु , तुम्ही केवळ हिंदू धर्मातीलच उदाहरणे का देता ? तुम्हाला इतर धर्मांतील उदाहरणे दिसत नाहीत काय ?" आता मात्र या मानवरूपी दानवाचा विवेकवाद पार झोपी गेला होता. तो उत्तरला "मी काय बोलायचे अन काय करायचे हे तुम्ही मला शिकवू नका. मी हिंदू धर्मात जन्मलो म्हणूनच मी हिंदू धर्मावर टीका करू शकतो. मुस्लीम धर्मावर टीका केल्यास मला जीव गमवावा लागेल आणि मी त्याला तयार नाही." त्याच्या या पूर्णत: विसंगत उत्तराने सर्व पत्रकार गोंधळले. काही वेळेपूर्वी स्वताला निधर्मी, बुद्धीवादी, निर्भीड आणि परखड म्हणून पोपटपंची करणारा शाम मानव लगेच पलटल्याचे पाहून आमच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.
     अखेर शाम मानवने ती प्रेस गुंडाळली आणि हळूच तेथून  सटकला. हळू-हळू आम्ही पत्रकार सुद्धा चर्वितचर्वण करीत आपापल्या वाटेला लागलो. मी मात्र शाम मानवचे खरे रूप समजून चुकलो होतो. स्वताला पुरोगामी, निधर्मी आणि तत्ववादी म्हणविणारा हा शाम मानव स्वताच मोठा भोंदू बाबा आहे. केवळ हिंदू धर्माशी खुन्नस ठेवायची आणि स्वताच्या जीवावर बेतली की शेपूट घालायचे हीच या हिंदू विरोधी वळवळयांची फितरत असल्याचे सत्य तेव्हा मला उमगले. तुम्ही सुद्धा अश्या भोंदू सुधारकांना ओळखून असा.त्यांचा पुरोगामित्वाचा बुरखा फाडण्याची संधी आल्यास मुळीच दवडू नका. तूर्तास एवढेच .....
                                                                                                                                                                                                                               वंदे मातरम !!!

5 comments:

  1. मला वाटत'आपल ज्ञान कमी असेल आपल्या सारख्या कडून होणारे असे प्रयत्न फुकट आहे याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही ,फक्त आपली कीर्ती वाढली

    ReplyDelete
  2. हे आपलं चुकीचं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
    सत्य ते सत्यच असते आपण कितीही तूप लोणी लावलं तरी काहीही होणार नाही म्हणे दै.सकाळ मध्ये काम करत होतो.

    ReplyDelete
  3. एखादी व्यक्ती निदान हिंदु धर्मात का होईना सुधारणा करण्याचा प्रयत्न करते आहे, हे कमी आहे का? ते जे करत नाहीत त्यावर बोट ठेऊन आणि ते प्रसिद्ध करून तुम्ही मोठे पत्रकार होणार आहात का? दुसऱ्यांच्या चुका शोधणे कृपया बंद करा. चांगल्या कामाचं स्वागत आणि कौतुक करायला आपण कधी शिकणार?

    ReplyDelete
  4. अरे भाऊ तु केवळ द्वेषातून लिहिले आहे हे जागोजागी लक्षात येतेय .. फेकू दिसतोस एक नंबर

    ReplyDelete