Tuesday, 17 July 2012

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विनोद !

माझ्या फेसबुक वरील मैत्रांनो , आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विनोद सांगणार आहे. तसे मी २००९ पासून फेसबुक वर असल्याचे मला आठवते. मात्र दि.१ मे २०११ पासून माझा या सोशल नेट्वर्किंग साईट वरील खरा वावर सुरु झाला. आज या गोष्टीला १४ महिने पूर्ण झाले आहेत. या दरम्यान आजपर्यंत मला २४४१ मैत्र लाभलेत. या मध्ये काही समविचारी तर काही विरोधी विचारांचे देखील आहेत. काही जन तठ्स्त तर काही केवळ हौसे मौजे खातर फेसबुक वर आलेले आहेत. काही असे पण आहेत की ज्यांचे अकौंट बळजबरीने काढले असेल. तर असो, मी मात्र अगदी विचारपूर्वक या माध्यमाशी जोडलेला आहे. राष्ट्रवादी ( शरद पवारांचा ढोंगी आणि स्वार्थी राष्ट्रवाद नव्हे. तो  तर सच्च्या राष्ट्रवादाला लागलेला कलंक आहे )विचारांचा प्रचार-प्रसार करणे आणि सर्वदूर पसरलेल्या माझ्या राष्ट्रनिष्ठ लोकांना जोडणे हे माझे मुख्य ध्येय आहे. आईच्या गर्भात असल्या पासून माझ्यावर रा.स्व.संघाचे संस्कार झाले असून माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत ते कायम राहतील. मला त्या बद्दल यथार्थ अभिमान आहे. ही बाब मी कधीच लपवून ठेवली नाही.
         मी संघ स्वयंसेवक असल्यामुळे साहजिकच माझ्या विचारातून आणि लिखाणातून संघाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद क्षणोक्षणी डोकावतो. मात्र, फेसबुक वरील काही अजाण लोकांनी  या बद्दल भलताच गैरसमज करून घेतला आहे. त्यांच्या मते रेणुकादास मुळेला फेसबुक वर बसून संघाचा प्रचार करण्याचे तासाप्रमाणे पैसे मिळतात. आता या मूढमती मित्रांच्या जावईशोधावर हसावे की त्यांच्या बालिश बुद्धीची कीव करावी असा प्रश्न मला पडलाय. जीवनात कधीच कोणत्या विचारधारेचा पुसटसाही स्पर्श न झालेले लोक असाच समज करून घेणार हे मला समजते. मी संघ विचाराने काम करतो. जगात मार्क्सवाद, गांधीवाद, समाजवाद , लेनिनवाद असे अनेक विचारप्रवाह आहेत. त्या-त्या विचाराने प्रभावित झालेले कार्यकर्ते  आपापल्या परीने कार्य करीत आहेत. त्यांच्या विषयी देखील असाच विचार केला गेला तर तो कितीसा समर्थनीय ठरेल ? निश्चितच अश्या गैरसमजाचे कोणीच समर्थन करू शकणार नाही. एखाद्या विचाराने प्रेरित होणे ह्या अनुभूतीची जाणीव ज्यांच्या जीवनास कधी झालीच नाही त्यांना मात्र हे सर्व माफ आहे. अश्याच पैकी एक असावा की ज्याने माझ्या फेसबुक वरील अस्तित्वला पैश्याच्या तराजूत तोलण्याचा बालिश प्रयत्न केला. त्या  'विनोद'वीराला मी समजून घेतले आहे. आणि त्याचा तर्क हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा 'विनोद' ठरला असून त्या विनोदाचा जन्मदाता म्हणून 'खरे' तर तो अभिनंदनास पत्र ठरतो. अभिनंदन मित्रा,........वंदे मातरम !!!